Home latest News उभ्या ट्रकला कोळसा भरलेल्या ट्रक ची जोरदार धडक

उभ्या ट्रकला कोळसा भरलेल्या ट्रक ची जोरदार धडक

109
उभ्या ट्रकला कोळसा भरलेल्या ट्रक ची जोरदार धडक

उभ्या ट्रकला कोळसा भरलेल्या ट्रक ची जोरदार धडक

उभ्या ट्रकला कोळसा भरलेल्या ट्रक ची जोरदार धडक

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953

उमरेड.उमरेड – चिमूर महामार्गावर रात्रीच्या सुमारात उभा असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या कोळशाच्या ट्रकने दिली जोरदार धडक. या धडकेत कोळशाचा ट्रक रोडलगत पलटला. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना दि. २५ रात्री ११.३० दरम्यान चिचाळा (ता) भिवापूर परिसरात मार्गावर उभा असलेला ट्रक एम.एच ४० सी. डी ८२५२ क्रमांकाच्या ट्रकला मागून कोळशाने भरलेला एम. एच.४०सी.डी.०३२८ क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. सदर दोन्हीही ट्रक पिरावा येथील गोकुळ खदान्यातील असून कोळसा घेऊन उमरेड च्या दिशेने जात होते. यात धडक देणारा ट्रक रोडलगत असलेल्या शेतात जाऊन पलटला. दोन्ही ट्रकच्या केबिन ट्रॉली पासून वेगळ्या झाल्याने अपघाताचे गांभीर्य दिसून येते मात्र जीवितहानी टाळली.