कळमना येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
• बहुजन मेडीकोज असो. व भूमिपुत्र ब्रिगेड कळमना यांचा पुढाकार

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 26 फेब्रुवारी
बहुजन मेडीकोज असो. चंद्रपूर व भूमिपुत्र ब्रिगेड शाखा कळमनाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले.
तज्ञ डॉक्टरांतर्फे शेकडो रुग्णांची तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात आले. ब्लड शुगर तपासणी देखील करण्यात आली. बालरोगतज्ञ डॉ अभिलाषा गावतुरे, डॉ सुवर्णा सोंडवले, डॉ समृद्धी वासनिक, डॉ रुपाली नगराळे, हृदयरोगतज्ञ डॉ राहुल नगराळे, सर्जन डॉ राजू शेंडे, स्त्रीरोगतज्ञ डॉ धनश्री शेंडे, डॉ प्रीती बांबोळे , मानसिक रोग तज्ज्ञ डॉ विवेक बांबोळे , पैथोलॉजिस्ट डॉ राकेश गावतुरे ,दंत चिक्तिसक डॉ स्नेहल खोब्रागडे, डॉ राजु ताटेवार, आयुर्वेदिक सर्जन डॉ राकेश वनकर, डॉ पोडशेलवार, डॉ दीपक जोगदंड, डॉ शुभम देवगडे, डॉ प्रमेय भगत, फार्मासिस्ट निधी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सिस्टर स्टाफ, तसेच भूमिपुत्र ब्रिगेड कळमना चे सर्व कार्यकर्ते यांचा यावेळी सहभाग होता. भूमिपुत्र ब्रिगेडच्या शाखा कलमना च्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.









