चंद्रयान 3 महिला प्रभागसंघ चेंढरे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग-महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती अलिबाग अंतर्गत चंद्रयान 3 महिला प्रभागसंघ चेंढरे यांची वार्षिक सर्वसाधारण सभा वाडगाव मध्ये संपन्न झाली.
सदर सभेस जुईली पाटील माजी पंचायत समिती सदस्य तसेच शिरीष पाटील (जिल्हा अभियान व्यवस्थापक रायगड अलिबाग )तसेच माधुरी जाधव DMIBCB, तसेच सुजाता पाटील DMFI ,ग्रामपंचायत वाडगाव सरपंच सारिका गणेश पवार, वाडगाव ग्रामपंचायत सदस्य, खंडाळे ग्रामपंचायत सदस्य, वेश्वी ग्रामपंचायत सदस्य, रिद्धी आवळे (तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती अलिबाग), रिया पाटील IBCB (पंचायत समिती अलिबाग), प्रभाग समन्वयक साईनाथ पाटील, गणेश मस्के, सोनम पवार, अमोल माळी व प्रभागसंघ अध्यक्ष ,कोषाध्यक्ष ,सचिव तसेच सर्व सीआरपी, बँक सखी तसेच सर्व स्वयंसहायता समूहातील महिला उपस्थित होत्या.
सदर सभेत प्रास्ताविक व अहवाल वाचन करण्यात आले. शिरीष पाटील यानी प्रभाग संघाच्या पुढील नियोजनाबद्दल व प्रत्येक महिलेने व्यवसायात उतरावे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर तालुका अभियान व्यवस्थापक रिद्धी आवळे यांनी महिलांना महिला सक्षमीकरणाविषयी मार्गदर्शन केले.









