Home मुंबई स्मिथ, वॉर्नरवरील बंदी योग्यः सचिन

स्मिथ, वॉर्नरवरील बंदी योग्यः सचिन

75

नवी दिल्ली- चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं घातलेली बंदी योग्यच आहे, असं ठाम मत भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं या संदर्भात एक ट्विट केलं असून स्मिथ-वॉर्नरवरील बंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेट खेळ हा पारदर्शकपणे खेळला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. जे काही झालं ते अत्यंत चुकीचं झालं. असं असलं तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं याबाबत जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य आहे. संघासाठी विजय महत्त्वाचा असतो. परंतु, तो तुम्ही कशा पद्धतीनं मिळवता हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं, असंही सचिन ट्विटमध्ये म्हणाला.