मुंबई शिवसेनेचं फडणवीस यांना आव्हान By Bhaguram Sawant - March 30, 2018 72 Share WhatsApp मुंबई: दोन वर्षांत ७२ हजार सरकारी नोकऱ्या देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘बोलायचे आणि विसरून जायचे. थापा मारून वेळ काढायचा हे तंत्र नव्या सरकारला चांगलेच जमते,’ असं सुनावतानाच, ‘पहिल्या वर्षी ३६ हजार जागा भराल, तेव्हा त्या लोकांची यादीही जाहीर करा,’ असं आव्हान उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांच्या रोजगारासंबंधीच्या घोषणेवर तिरकस भाष्य केलं आहे. एकूण ७२ हजारांपैकी ३६ हजार पदे याच वर्षी भरू, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. या घोषणेचं अभिनंदन करतानाच उद्धव यांनी फडणवीसांना निवडणुकीआधी भाजपनं दिलेल्या आश्वासनांचीही आठवण दिली आहे. राज्यात फडणवीसांचे सरकार विराजमान झाले तेव्हा पुढील पाच वर्षांत २० लाख रोजगार उपलब्ध होतील असे सांगण्यात आले. त्यातील किती जणांच्या हातास काम मिळाले? आता सरकारी नोकरभरतीची ‘लॉटरी’ जाहीर झाली. पोलिसांना, गरीबांना घरे देण्याच्याही मोठ्या घोषणा झाल्या आहेत.