Home latest News सांगलीत खळबळ: आदिवासी समाजाच्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणी विहिरीत आढळल्या मृतावस्थेत.

सांगलीत खळबळ: आदिवासी समाजाच्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणी विहिरीत आढळल्या मृतावस्थेत.

80

सांगलीत खळबळ: आदिवासी समाजाच्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणी विहिरीत आढळल्या मृतावस्थेत.

सांगलीत खळबळ: आदिवासी समाजाच्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणी विहिरीत आढळल्या मृतावस्थेत.
सांगलीत खळबळ: आदिवासी समाजाच्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणी विहिरीत आढळल्या मृतावस्थेत.

संजय कांबळे ✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
सांगली:- सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथुन एक काळीज हेलावणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. करगणी येथील राहणाऱ्या दोन अल्पवयीन सख्या बहिणी घरा शेजारी असणाऱ्या एका विहिरीत मृतावस्थेत आढळल्या आल्या. ही घटना समोर येताच गावात एकच हाहाकार माजला.

आदिवासी समाजाच्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींचा अशाप्रकारे दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याने परीवारावर शोककळा पसरली असून गावात सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सविता मोतीराम पवार वय 18 वर्ष आणि संगीता मोतीराम पवार वय 14 वर्ष असं मयत झालेल्या सख्ख्या बहिणींची नावे असुन त्या दोन्ही मुली मुळच्या रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील रातवड येथील राहणा-या होत्या.

आदिवासी समाजातील सविता मोतीराम पवार आणि संगीता मोतीराम पवार या मुली आपल्या कुटुंबीयांसोबत करगणी परिसरात वास्तव्याला आहेत. दरम्यान मंगळवारी दोंघीचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असणाऱ्या एका विहिरीत आढळून आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, आदिवासी समाजातील कोळसे तयार करणारी काही कुटुंबं आटपाडी तालुक्यातील करगणी परिसरात वास्तव्याला आहेत. करगणी गावापासून काही अंतरावर असणाऱ्या वेताळ मंदिराजवळील बंधाऱ्यावरील विहिरीत या अल्पवयीन बहिणींचा मृतदेह आढळला आहे. खरंतर, मृत मुलीचं बंधाऱ्यावर नेहमी ये-जा होती. या मुली नेहमी पाणी भरण्यासाठी, कपडे धुण्यासाठी आणि मासेमारी करण्यासाठी बंधाऱ्यात जात होत्या.
हेही वाचा-दुकानात गेलेल्या मुलीसोबत शेजाऱ्याचं विकृत कृत्य; भयावह अवस्थेत आढळली चिमुकली

पण मंगळवारी अचानक दोन्ही मुली विहिरीत मृतावस्थेत आढळल्या आहेत. दोन्ही मुलींचा मृत्यू पाण्यात पडल्याने बुडून झाल्याची माहिती वैद्यकीय अहवालात समोर आली आहे. पाय घसरून मुली अपघाताने पाण्यात पडल्या असाव्यात, यातचं त्यांचा दुर्दैवी अंत झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत.