भीम आर्मी जळगाव जिल्हा युनिट तर्फे भव्य रस्ता रोको आंदोलन

मीडिया वार्ता न्यूज
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
विशाल सुरवाडे
जळगाव-झोपी गेलेल्या प्रशा नाला जागे करण्यासाठी भिम आर्मी जळगांव जिल्हा युनिट व यावल तालूका युनिट च्या वतीने दि.०१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चुंचाळे गाव व चुंचाळे फाटा दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था बघून व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता भिम आर्मी च्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा केला परंतु झोपलेल्या प्रशासनाने दखल घेतली नाही.
फक्त सामाजिक कार्य करणे हेच कर्तव्य न मानता सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविणे हे प्रथम कर्तव्य मानून,अश्या या बेजबाबदार प्रशासनाच्या विरुद्ध दि.०१ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजता,चुंचाळे फाटा यावल-चोपडा रोड येथे भव्य रास्ता रोको आंदोलन आयोजित भीम आर्मी जळगाव तर्फे करण्यात आलेले आहे जेणेकरून झोपलेल्या प्रशासनाला जाग येईल व रस्ता दुरुस्ती च्या कार्याला वेग प्राप्त होईल.
तरी सदर रास्ता रोको आंदोलनात “भिम आर्मी” जळगांव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिट तसेच ईतर सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्यात योगदान द्यावे असे जाहीर आवाहन. भीम आर्मी जळगाव जिल्हा युनिट तर्फे करण्यात आले आहे
आंदोलन स्वरूप रास्ता रोको आंदोलन.
दिनांक ०१ सप्टेंबर २०२१.
वेळ- ठीक सकाळी १०:०० वाजता.
-स्थळ चुंचाळे फाटा यावल चोपडा रोड.