Home रायगड नेरळ पोलिस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकता दौड’ उत्साहात साजरी

नेरळ पोलिस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकता दौड’ उत्साहात साजरी

221

नेरळ पोलिस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकता दौड’ उत्साहात साजरी

संदेश साळुंके कर्जत रायगड प्रतिनिधी 9011199333
नेरळ, ता. कर्जत (रायगड) – भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आज नेरळ पोलिस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्हा पोलिस दलामार्फत मा. पोलिस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरली “एकता दौड” — सकाळी आठ वाजता नेरळ पोलिस ठाण्यापासून प्रारंभ होऊन मारुती मंदिर, शिवाजी चौक, खांडा, टीवळे नाका असा मार्गक्रमण करत पुन्हा पोलिस ठाण्यात समारोप करण्यात आला. या दौडीत एकता आणि राष्ट्रभावना यांचा संदेश देत पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

या प्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी पांढऱ्या टी-शर्टमधून एकता आणि शिस्तीचे प्रतीकात्मक दर्शन घडविले. “एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दौडीनंतर राष्ट्रीय एकता व अंतर्गत सुरक्षा या विषयावर अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे स्मरण करत, देशाच्या एकतेसाठी त्यांच्या योगदानाची प्रेरणा घेऊन पोलिस दलाने राष्ट्रीय एकात्मतेचा संकल्प केला. समाजात सौहार्द, अनुशासन व राष्ट्रप्रेम वाढविण्याच्या हेतूने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.