आमदार बंटी भांगडीया ठरले नागभीड वासियासाठी देवदूत.

48

आमदार बंटी भांगडीया ठरले नागभीड वासियासाठी देवदूत.

आमदार बंटी भांगडीया ठरले नागभीड वासियासाठी देवदूत.
आमदार बंटी भांगडीया ठरले नागभीड वासियासाठी देवदूत.

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर(नागभीड):- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, कोरोना संक्रमण काळात जिकडे तिकडे ऑक्सिजनची कमी असल्यामुळे कोविड रुग्ण दगावत होते अशा काळात आमदार बंटी भांगडिया यांनी नागभीड तालुक्यातील कोविड रुग्णांना ऑक्सिजन स्वखर्चातून देऊन उपलब्ध करून नागभीडकरांसाठी देवदूत ठरले.

जन सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रिद लक्षात घेऊन चिमुर विधानसभा क्षेत्रात विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे युवा तडफदार,गोर गरिबांचे कैवारी अशी आमदार बंटी भांगडीया जनसामान्यात प्रतिमा आहे गरिबांच्या मदतीला तत्पर असणारे आमदार यांनी कोविड रुग्णांची व जनतेची समस्या लक्षात घेऊन 10 जम्बो आक्सिजन सिलेंडर व 500 लिटर सॅनिटायझरच नागभीड येथील कोविड सेंटर आरोग्य विभागाला दिली मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे लाकडाऊन च्या काळात तेव्हा गरीब कुटुंबातील लोकांची हातची कामे गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून अन्न-किराणा किट वाटप तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मार्फत भोजन पंगत असे अनेक नियोजनात्मक कार्यक्रम राबविले.संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्रात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.ह्याच परिस्थितीचा आढावा घेऊन बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांनी स्वखर्चाने नागभीड तालुक्यातील संपूर्ण शासकीय कार्यालयात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संतोष रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी मार्फत तालुक्यातील संपूर्ण शासकीय कार्यालयात 500 लिटर सॅनिटायझर हे वाटप केले.

तसेच नागभीड तालुक्यात कोरोनाचा हॉटस्पॉट असून गरीब जनतेला मदत म्हणून कोरोनाचा संसर्ग बघता रुग्णांना ऑक्सिजन करिता भटकावे लागणार नाही व कुणाचेही कोरोनाच्या महामारीने मृत्यू होणार नाही ह्याकरीता 10 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर हे नागभीड येथील कोविडं सेंटर आरोग्य विभागाला प्रधान केलेला आहे. याप्रसंगी नागभीड येथील तहसीलदार श्री चौहान श्री भामरे नायब तहसीलदार,विनोद मडावी तालुका आरोग्य अधिकारी,पोलीस उपनिरीक्षक श्री खेडीकर भाजपा तालुकाध्यक्ष रडके , नागभीड नगर परिषद उपाध्यक्ष गणेश तर्वेकर ,आवेश पठाण सभापती कृ.उ बाजार समिती नागभीड,सचिन आकुलवार सभापती न.प नागभीड,डाँ . श्री कामडी तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.