Home मुंबई Anna Hazare: डबेवाले अण्णांच्या पाठिशी

Anna Hazare: डबेवाले अण्णांच्या पाठिशी

100

मुंबई:

जनलोकपालसह ११ मागण्यासांठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर सुरू केलेल्या आंदोलनाला मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. ‘सरकारनं अण्णांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात,’ अशी मागणी डबेवाल्यांनी केली आहे.

मुंबईतील डबेवाल्यांच्या संघटनेचे नेते सुभाष तळेकर यांनी याबाबत भूमिका मांडली. ‘उपोषण सुरू केल्यापासून अण्णांचे वजन चार ते पाच किलोनं कमी झालंय. अण्णांचं वय बघता त्यांच्या प्रकृतीला धोका आहे. त्यामुळं सरकारनं अण्णांच्या मागण्या मान्य करून त्यांचा जीव वाचवावा,’ अशी विनंती तळेकर यांनी केली आहे.

अण्णांच्या आंदोलनाला मुंबईच्या डबेवाल्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. गरज लागल्यास डबेवाल्यांचा एक प्रतिनिधी दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेईल,’ असंही ते म्हणाले. अण्णांनी २०११साली केलेल्या आंदोलनालाही मुंबईच्या डबेवाल्यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता,’ याची आठवणही त्यांनी दिली.