Home मुंबई टीम केजरीवालचा जेटलींकडे माफीनामा

टीम केजरीवालचा जेटलींकडे माफीनामा

65

 

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा माफीचा सिलसिला सुरूच आहे. बदनामीच्या खटल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल, आशुतोष आणि संजय सिंह यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माफी मागितली आहे. पण ‘आप’चे नेते कुमार विश्वास यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर अरुण जेटली यांनी अरविंद केजरीवाल, संजय सिंह, राघव चढ्ढा आणि आशुतोष यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी सुरुवातीला जेटलींची माफी मागितली. पण आशुतोष आणि संजय सिंह यांनीही माफी मागावी अशी मागणी करत जेटलींनी केजरीवाल यांची माफी नाकारली. आता चारही नेत्यांनी वेगवेगळी पत्र लिहून अरुण जेटलींची माफी मागितली आहे. पण या माफीनाम्यानंतरही जेटली बदनामीचा खटला मागे घेण्याच्या विचारात नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.