अहमदाबादः अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. यंदा या आठवड्यात बुधवारी अक्षय्य तृतीया आहे. बहुतेक जण अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत सोने खरेदी करतात. पण सोन्याच्या भावाने ३२ हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडल्याने अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

सीरियावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला आहे. शनिवारी अहमदाबादमध्ये सोन्याचा भाव तोळ्याला ३२, ३०० रुपयांवर गेला. गेल्या काही वर्षातील अक्षय्य तृतीयेचा सोन्याचा हा सर्वाधिक भाव आहे. तर चांदीचा भावही ४० हजार रुपये किलोवर गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here