वर्धा जिल्हातील कोविड रूग्णालयात कोरोना बाधित मृत महिलेच्या अंगावरील दागिने लपास.
✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीप✒
वर्धा, दि.23 मे:- वर्धा जिल्हातील सावंगी येथील माजी खासदार दत्ता मेघे यांचा कोविड रुग्णालयातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावंगी येथील कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना वायरस बाधित महिलेच्या मृत्यू पश्चात महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिन चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने रूग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कारंजा घाडगे येथील रहिवासी 67 वर्षीय महिलेला कोरोना वायरसचा प्रादुर्भाव झाला होता. या कोरोना वायरस बाधित महिलेची प्रकृती बिघडल्याने तीला सावंगी (मेघे) येथील कोविड रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरु असताना 5 मे रोजी महिलेचा मृत्यू झााला. दरम्यानच्या कालावधीत अज्ञाताने मृत बाधित महिलेच्या अंगावरील 10 ग्राम वजनाचे सोन्याचे मणी, 6 ग्राम वजनाचे सोन्याचे लॉकेट, काळ्या मण्यांत असलेली पोत असा एकूण 60 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. ही घटना उघडकीस येताच रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.याप्रकरणी सावंगी पोलिसात बाधित महिलेच्या मुलाने तक्रर दाखल केली असून पुढील तपास सावंगी पोलीस ठाण्याचे ठाणेदार थोरात यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.