पँथर सेना सामाजिक संघटनेच्या मिरज तालुकाध्यक्षपदी निशांत भांडारे यांची निवड.
✒मिरज प्रतिनिधी✒
मिरज:- पँथर सेना महाराष्ट्र राज्यात आक्रमक व सक्रिय असनारी संघटना आहे. निशांत भांडारे यांनी पँथर सेनेत सहभागी होण्यासाठी मागणी केली होती. पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सागर साबळे व सांगली जिल्हाध्यक्ष मानतेशकांबळे यांच्या सुचनेने आज दिनांक 01/06/2021 रोजी संघटना प्रमुख सतिशभाऊ पट्टेकर यांच्या आदेशाने निशांत भांडारे यांची मिरज तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. सर्वत्र निशांत भंडारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.