दोंडाईचा निमगूळ रस्त्यावर बस व दुचाकीचा अपघात ; पती पत्नी दोघे ठार….

दोंडाईचा निमगूळ रस्त्यावर बस व दुचाकीचा अपघात ; पती पत्नी दोघे ठार….

दोंडाईचा निमगूळ रस्त्यावर बस व दुचाकीचा अपघात ; पती पत्नी दोघे ठार....
दोंडाईचा निमगूळ रस्त्यावर बस व दुचाकीचा अपघात ; पती पत्नी दोघे ठार….

नामदेव धनगर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
9623754549

शिंदखेडा तालुक्यातील निमगूळहून दोंडाईचा कडे जातांना दुचाकी व बस चा अपघात झाला त्या अपघातात नंदुरबार तालुक्यातील ओसरली येथील पती-पत्नी ठार झाल्याची घटना आज गुरुवार सकाळी 10=30 वाजेच्या दरम्यान घडली…

सविस्तर माहिती – निमगुळ दोंडाईचा रस्त्यावर निमगुळ गावापासून दोंडाईचा कडे जातांना बस व दुचाकी यात धडक त्यात नंदुरबार तालुक्यातील ओसरली येथील रविंद्र मुकुंदर गिरासे वय 60 उजनबाई रविंद्र गिरासे वय 50 रा. ओसरली. हे दोघे पती पत्नी एम एच 05 ए एल 260 क्रमांकांच्या दुचाकीने दवाखाना व बाजार करण्यासाठी दोंडाईचा कडे जात असताना एम एच 20 बी एल 4045 क्रमांकाची धुळे बडोदा बस व दुचाकीची धडक झाल्याने सदर अपघातात दोघे पती पत्नी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दोंडाईचा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ अर्जुन नरोटे यांनी मृत घोषित केले आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन गायकवाड, दिनेश मोरे यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.. अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईक व गावातील मंडळींनी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली व नातेवाइकांनी एकच टाहो फोडला होता…