Home latest News *100 दलित कुटुंबास गाव सोडण्यास भाग पाडणाऱ्यावर कडक कारवाई करा*

*100 दलित कुटुंबास गाव सोडण्यास भाग पाडणाऱ्यावर कडक कारवाई करा*

68

*100 दलित कुटुंबास गाव सोडण्यास भाग पाडणाऱ्यावर कडक कारवाई करा*

सतीश म्हस्के                                        जालना जिल्हा प्रतिनिधीमो.     9765229010

आज रिपब्लिकन सेना जालना जिल्ह्याच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र अध्यक्ष सागरजी डबरासे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील जातीय द्वेषातून 100 दलितांनी गाव सोडलेला आहे.त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या जातीवादी गावगुंडांना अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे.व त्यांच्या त्रासापासून गाव सोडणाऱ्या दलितांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. असे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी मराठवाडा महासचिव अण्णासाहेब चित्तेकर, पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वावळकर, पूर्व जिल्हा अध्यक्ष दिनेश भाऊ आदमाने, जिल्हा महासचिव चंद्रकांत खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्के, जिल्हा सचिव नवनाथ ठोके, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश वानखडे, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष विशाल छडीदार व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते