Home latest News बोन्साय ट्री निर्मिती व झाडांची निगा राखणे यावर कार्यशाळा संपन्न. – नैसर्गिक...

बोन्साय ट्री निर्मिती व झाडांची निगा राखणे यावर कार्यशाळा संपन्न. – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम. – डॉ. सिंधुताई उपगन्लावार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम संपन्न.

62

बोन्साय ट्री निर्मिती व झाडांची निगा राखणे यावर कार्यशाळा संपन्न.
– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम.
– डॉ. सिंधुताई उपगन्लावार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम संपन्न.

बोन्साय ट्री निर्मिती व झाडांची निगा राखणे यावर कार्यशाळा संपन्न. - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम. - डॉ. सिंधुताई उपगन्लावार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम संपन्न.
बोन्साय ट्री निर्मिती व झाडांची निगा राखणे यावर कार्यशाळा संपन्न.
– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम.
– डॉ. सिंधुताई उपगन्लावार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम संपन्न.

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने संस्थेच्या तालुका संघटिका तथा प्रमुख मार्गदर्शीका राजश्री समीर उपगन्लावार यांचे घरी, राजीव गांधी चौक, राजुरा येथे बोन्साय ट्री निर्मिती व झाडाची निगा कशी राखायची या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सिंधुताई उपगन्लावार यांच्या तेराव्या पुण्यतिथी निमित्य करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग अध्यक्ष बादल बेले यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून तालुका महिला अध्यक्षा अल्का दिलीप सदावर्ते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वृक्ष पूजन करण्यात आले. तसेच स्वर्गीय डॉक्टर सिंधुताई उपगन्लावार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राजश्री उपगन्लावार यांनी विविध प्रजातीच्या वृक्षांचे बोन्साय ट्री निर्मिती कसे करायचे याबाबत सविस्तपणे मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विविध झाडांना बोंसाई ट्री निर्मिती करून दाखविले. झाडांची निगा राखताना घ्यावयाची काळजी, झाडांचे संगोपन कसे करायचे, बोन्साय ट्री चे विविध प्रकार, बोन्साय ट्री ची पार्श्वभूमी, झाडाना आकार कसा द्यायचा, एकाच झाडापासून विविध झाडे कसे तयार करायचे, आदी विषयांवर सविस्तपणे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता कुंभारे, शहर संघटिका यांनी केले. तर प्रास्ताविक अल्का सदावर्ते, तालुका महिला अध्यक्षा यांनी केले. आभार भास्कर करमरकर, तालुका संघटक यांनी मानले. यावेळी दिलीप सदावर्ते, विलास कुंदोजवार, अविनाश दोरखंडे, नरेंद्र देशकर, अल्का गंगशेट्टीवार, संगीता पाचघरे, एड. सारिका जेणेकर, डॉ. सुरेश उपगन्लावार, समीर उपगन्लावार, सुनीता देशकर, राधा दोरखंडे, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता अल्का सदावर्ते यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या गितानी केली. उपस्थिती सभासदानीही बोन्साय ट्री तयार केले.