Home latest News येत्या शुक्रवारपर्यंत निर्बंध शिथील होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

येत्या शुक्रवारपर्यंत निर्बंध शिथील होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

87

येत्या शुक्रवारपर्यंत निर्बंध शिथील होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

येत्या शुक्रवारपर्यंत निर्बंध शिथील होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा : राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरली असून कोरोना रुग्णांची संख्या फारच कमी झाली आहे. कोविड पॉझिटीव्ह चे आकडे लक्षात घेता लोकांना दिलासा मिळण्यासाठी पारंपारिक यात्रा, शंकरपट यांचे आयोजन करण्यास कोरोना निर्बंधांमुळे अनेक अडचणी येत आहेत. राज्यातील कोरोना निर्बंध तत्काळ हटविले जावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटून केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी येत्या शुक्रवारपर्यंत निर्बंध शिथिल केले जातील असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.
कोरोना निर्बंधामुळे पारंपारिक यांत्रांवर तसेच शंकरपटाच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे लोकांमध्ये निराशा निर्माण झाली होती. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरायला सुरूवात झाली. अलीकडे कोविड पॉझिटिव्हचे आकडे फारच कमी झाल्याने राज्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण ठरत आहे. येत्या शुक्रवारपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आल्यास लोकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.