Home latest News हद्दपार होत आहे कोरोना जिल्हा मधुन

हद्दपार होत आहे कोरोना जिल्हा मधुन

77

हद्दपार होत आहे कोरोना जिल्हा मधुन

हद्दपार होत आहे कोरोना जिल्हा मधुन

✍मुकेश मेश्राम ✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा:-जिल्ह्यात एकेकाळी धुमाकूळ घातलेला कोरोना विषाणू आता हळूहळू हद्दपार होत आहे. या आठवड्यात बाधितांचा आकडा हा एक अंकी असला तरी विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे आता पुन्हा सतर्क राहावे लागणार आहे. भंडारा जिल्ह्यात डिसेंबर महिन्यापासून कोरोनाने उच्चांक गाठला होता. जानेवारी महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढली गेली. जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने विभागाने प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर प्राधान्याने भर दिल्याने कोरोना बाधित आटोक्यात आले.
जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने राबविल्याने रुग्णसंख्या आणण्यात
आटोक्यात प्रशासनाला यश आले आहे. ग्रामीण भागात 10 पेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या हॉटस्पॉट गावांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. 100 च्या वर या गावांचा आकडा होता. या गावात प्राधान्याने रुग्णसंख्या कमी करण्यासाठी धडक सर्वेक्षण मोहीम प्रशासनाने आखली. घरोघरी जाऊन संशयितांची तपासणी करण्यात आली. यात अनेक बाधित आढळल्याने त्यांना योग्य उपचार वेळीच मिळाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले आहे.