Home latest News जिल्ह्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची 1450 कामे सुरू जानेवारीपासून मजुरांची कामावर उपस्थिती

जिल्ह्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची 1450 कामे सुरू जानेवारीपासून मजुरांची कामावर उपस्थिती

70

जिल्ह्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची 1450 कामे सुरू
जानेवारीपासून मजुरांची कामावर उपस्थिती

जिल्ह्यात राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची 1450 कामे सुरू जानेवारीपासून मजुरांची कामावर उपस्थिती

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/भंडारा: कोरोनाच्या प्रकोपामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला खीळ बसली होती. मात्र आता रोहयोव्दारे मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. सध्या जिल्ह्यात या योजनेची 1 हजार 450 कामे सुरू असून प्रतिदिन 82 हजार 996 अपेक्षित मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कोरोनाच्या भितीमुळे मजूर कामावर हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला होता अशा परिस्थितीत नरेगाची कामे पुरेशा प्रमाणात लेबर बजेट तयार असूनही जून महिन्यापर्यत कामे सुरू करण्यास अनुकूल परिस्थिती नसल्याने मजूर उदासिन होते. नंतरच्या काळात कोरोना परिस्थिती काही प्रमाणात सावरली. ग्रामपंचायत पातळीवर प्रचार, प्रसिध्दीव्दारे मजुरांना प्रोत्साहित केल्यानंतर कामाची मागणी प्राप्त झाल्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुरेशा प्रमाणात नरेगाची कामे सुरू करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात एकूण 2 लक्ष 68 हजार 748 कुटुंबांनी नोंदणी केली असून यापैकी 1 लाख 34 हजार 143 कुटुंबांनी कामासाठी मागणी नोंदविली आहे. यामध्ये 2 लक्ष 60 हजार 310 मजुरांना काम दिले असून प्रतिदिन 82 हजार 996 अपेक्षित मजुरांना काम उपलब्ध करून दिले आहे. मजूर उपस्थितीत जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी आहे.
तालुकानिहाय पाहिल्यास भंडारा 174 कामे 7 हजार 416 मजूर उपस्थिती, लाखांदूर 196 कामे 18 हजार 279 उपस्थिती, लाखनी 101 कामे 15 हजार 449 मजूर उपस्थिती, मोहाडी 131 कामे 15 हजार 395 मजूर उपस्थिती, पवनी 211 कामे 6 हजार 439 मजूर उपस्थिती, साकोली 186 कामे 13 हजार 618 मजूर उपस्थिती, तुमसर 451 कामे 6 हजार 400 मजूर उपस्थिती अशी एकूण 1 हजार 450 कामावर 82 हजार 996 मजूर उपस्थिती आहे.