Home latest News पत्नीची छेड काढणाऱ्याचे पतीने फावड्याने मुंडके छाटले.

पत्नीची छेड काढणाऱ्याचे पतीने फावड्याने मुंडके छाटले.

83

पत्नीची छेड काढणाऱ्याचे पतीने फावड्याने मुंडके छाटले.

किरकोळ घटनाही रागाच्या भरात वादावादीवरून हाणामारीपर्यंत पोहचतात. मात्र, काहीजण रागाच्या भरात क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडतात. उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये अशीच एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एकाने पत्नीची छेड काढल्याचे समजल्यावर संतप्त झालेल्या तिच्या पतीने दोन जणांच्या मदतीने छेड काढणाऱ्याचे फावड्याने मुंडके छाटले. यावरच तो थांबला नाही, तर हत्येचा उलगडा होऊ नये, यासाठी ते मुंडके चार किलोमीटर अंतरावर फेकून आला. या प्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. त्यात छेड काढण्यात आलेल्या महिलेचाही समावेश आहे.

उत्तर प्रदेश:- देवरियामध्ये 2 नोव्हेंबरला शिर नसलेले धड आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला सुरूवात केली. श्वान पथकाच्या मदतीने शिर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळापासून चार किलोमीटर अंतरावर उसाच्या शेतात छाटलेले मुंडके आढळले. मृताचे नाव राजू स्वांसी असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. तो झारखंडच्या खूंटी जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला असून चारजणांना अटक केली आहे.

एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या निकोलसच्या पत्नीची राजूने छेड काढली होती. तसेच तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने याचा विरोध केला. याबाबत तिचा पती निकोलसला समजल्यावर तो संतप्त झाला. दोन साथीदारांना सोबत घेऊन त्याने राजूला गाठले. त्या तिघांनी राजूला मारहाण केली. त्यानंतर रस्सीने त्याचा गळा आवळला आणि चाकूने त्याचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. चाकूने गळा कापला गेला नाही. त्यामुळे त्यांनी फावड्याने राजूचे मुंडके छाटले. त्यानंतर हत्येचा उलगडा होऊ नये, यासाठी राजूचे छाटलेले मुंडके त्यांनी चार किलोमीटर अंतरावर उसाच्या शेतात फेकून दिले.

देवरियाच्या रामपूरमध्ये शिर नसलेला मृतदेह 2 नोव्हेंबरला आढळला होता. श्वान पथकाच्या मदतीने मृतदेहाचे शिर शोधण्यात आले. त्यानंतर या हत्येचा उलगडा करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नीची छेड काढल्याच्या रागातून निकोलस या आरोपीने हे कृत्य केल्याचे तपासत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. राजूने छेड काढून जबरदस्ती केल्याचा आपण विरोध केला होता. मात्र, याबाबत निकोलसला समजल्यावर त्याने रागाच्या भरात राजूची हत्या केल्याचे निकोलसच्या पत्नीने सांगितले.

या प्रकरणी निकोलसच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. तिने पुरावे नष्ट करण्यासाठी निकोलस आणि त्याच्या दोन साथीदारांची मदत केल्याचा आरोप पोलिसांनी तिच्यावर ठेवला आहे. निकोलस, त्याची पत्नी आणि निकोलसचे दोन साथीदार यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून फावडा,चाकू, रस्सी जप्त केली आहे. ते मूळचे झारखंडचे असून देवरियामध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करतात. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.