सावरगांव वासी तरूणांचा प्रेरणादायी काम :
नऊ वर्षाच्या मुलाच्या उपचारास गावकर्यांनी केली आर्थिक मदत.

✒सागर अलोने✒
सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधी
96375 65247
सावरगांव: मंगळवारी रात्री जेवणानंतर आपल्या आई सोबत बसस्थानकावर निघालेल्या नऊ वर्षाच्या मुलाला दुचाकीस्वारांनि धडक मारली यात मुलाच्या डोक्याला आणि पायाला गंभीर जखमी होऊन रक्ताचा धारा सांडू लागल्या.
सुमेध (बंन्टी) चद्रशेखर मेश्राम असे मुलाचे नाव आहे सुमेध ला लगेच तळोधी येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचाराचा अभावामुळे तिथून ब्रम्हपुरी येथील आस्था रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. उपचारादरम्यान समोर आले की सुमेधचा डावा पायाची हड्डी मोडून डोक्याला गंभीर जखम आहे. आणि उपचारासाठी लाखों रूपयांची गरज आहे.
सुमेधच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने त्यांना धक्काच बसला. त्याचे वडील चंद्रशेखर मेश्राम मजुरी करून कुटुंबाचे पालन-पोषण करतात.
आता समोर मोठा प्रश्न निर्माण झाला. त्याची जिवन भर कमावलेली पुंजी उपचारास अपुरी पडत होती.
सुमेध परिसरातील तरूणांचा लाडका आहे. तरुणांनी त्याचा मदतीस धावपळ सुरू केली.
आणि मंत्री-संत्री कडे मदतीस हाथ पसरवला पण त्यांच्या हातात पाच-सहा पानांचा भाषणनाचा ऐवजी आतापर्यंत काहीही आलेला नाही.
त्यानंतर त्यांनी गावातील घरी-घरी जाऊन दोन दिवस दानशूर व्यक्तीकडून ३५ हजार रूपये गोळा केले तथा रात्री १२ वाजता रूग्णालयात जाऊन पूर्ण रक्कम त्याच्या परिवाराला देण्यात आली .
आणि १२ वाजून २० मिनिटांनी सुमेध चा पायाचा ऑपरेशन सुखरूप झाला.
तुषार मेश्राम, उमेश दामले, टोनेश खोब्रागडे, प्रविण लोनारे, सतीश लोनारे, कुणाल रामटेके, हर्षद बन्सोड, विनोद बन्सोड, अक्षय लोनारे, शुभम खोब्रागडे, हर्षल रामटेके.
असे या प्रेरणादायी युवकांचे नावे असून त्यांनी निःस्वार्थी भावनेने छोटीशी मदत पन प्रयत्न मोठे करून माणूसकी चे दर्शन








