Home latest News शेतकऱ्यांनी आर्थिक संपन्न व्हायचे असेल तर मोसंबी पिकाकडे वळावे : माजी मंत्री...

शेतकऱ्यांनी आर्थिक संपन्न व्हायचे असेल तर मोसंबी पिकाकडे वळावे : माजी मंत्री गिरीश महाजन

66

शेतकऱ्यांनी आर्थिक संपन्न व्हायचे असेल तर मोसंबी पिकाकडे वळावे
: माजी मंत्री गिरीश महाजन

शेतकऱ्यांनी आर्थिक संपन्न व्हायचे असेल तर मोसंबी पिकाकडे वळावे : माजी मंत्री गिरीश महाजन

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा : – येथून जवळच असलेले राजुरी तालुका पाचोरा येथे मोसंबी पीक परिसंवाद व शिवार फेरीच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले. यावेळी पाचोरा -भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील उपस्थित होते.

पाचोरा तालुक्यात राजुरी, पिंपळगाव हरेश्वर या दोन्ही गावांना मोसंबी लागवडीचे प्रमाण भरपूर असून या परिसरातील शेतकरी मोसंबी पीक घेण्यात अनुभवी आहेत. यानिमित्ताने राजुरी तालुका पाचोरा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र जळगाव, मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर व मोसंबी बागायतदार यांच्या संयुक्त विद्यमाने “आजादी का अमृत महोत्सव” या परिसंवादाच्या निमित्ताने साजरा करण्यात आला. परिसरातील एक हजार शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की शेतकऱ्याला जोपर्यंत शेतकरी झाल्यासारखं वाटत नाही तोपर्यंत शेतकरी सदन होणार नाही. असे आमदार पाटील यांनी आवाहन केले. तसेच शेती तज्ञ शास्त्रज्ञ डॉक्टर संजय पाटील यांनी मोसंबी पीक घेताना बारीक-सारीक प्रत्येक शेतकऱ्याने विचार केला पाहिजे. दररोज मोसंबीच्या झाडाजवळ जाऊन बोलले पाहिजे. तरच आपल्याला मोसंबीच्या समस्या समजेल. अन्यथा मोसंबी लावून उपयोग होणार नाही. असाही त्यांनी संदेश दिला. कोणता औषध उपचार करावा असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन राजुरी चे सरपंच राहूल पाटील प्रवीण पाटील व यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, पिंपळगाव शिंदाड जि प सदस्य मधुकर काटे, रावसाहेब पाटील, फलोत्पादन विषय विशेष तज्ञ डॉक्टर किरण जाधव, कृषी उपसंचालक जळगाव अनिल भोकरे, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, मोसंबी उत्पादक आदर्श शेतकरी प्रवीण पाटील, उपसरपंच नरेंद्र पाटील, शेखलाल तडवी, पोलीस पाटील नंदकिशोर पाटील, विठ्ठल गुंजाळ, निर्मल सीडस वनस्पती रोग तज्ञ किशोर पाटोळे आय सी एल कंपनी चे संजय मिरासदार, ऍग्रो वर्ल्ड चे संपादक शैलेंद्र चव्हाण, डॉक्टर वैभव सूर्यवंशी, भडगाव तालुका कृषी अधिकारी गोरडे, पी.पी. पाटील, संजय मालकर, दीपक परदेशी सतीश पाटील आदी उपस्थित होते.