Home latest News पडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघात गर्भवती मातेसह बालकाचा मृत्यू

पडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघात गर्भवती मातेसह बालकाचा मृत्यू

98

पडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघात
गर्भवती मातेसह बालकाचा मृत्यू

पडोली-घुग्घुस मार्गावर भीषण अपघात गर्भवती मातेसह बालकाचा मृत्यू

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

चंद्रपूर: पडोली-घुग्घुस मार्गावरील खुटाळा गावाजवळील राजस्थान ट्रक फॅक्ट्रीजवळ भरधार ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुपारी ११.४५ वाजताच्या घडली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. नम्रता निखील टावरी (२५), लक्ष टावरी (२) असे मृतकांचे नाव आहे. तर, निखील टावरी व कनक टावरी असे जखमींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खुटाळा गावातील लहूजी नगरातील निखील टावरी हे पत्नी नम्रता, लक्ष व कनक या तिघांना घेवून रूग्णालयात जात होते. रूग्णालयात जात असतांना राजस्थान ट्रक फँक्ट्री जवळ धरभाव वेगात येणाऱ्या ट्रकने टावरी यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
ही धडक इतकी जबर होती कि, गर्भवती नम्रता टावरी व दोन वर्षीय लक्ष टावरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, पती निखील टावरी व कनक टावरी हे गंभीर जखमी झाले. दरम्यान घटनास्थळी उपस्थित नागिरकांनी ट्रकचालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वी खुटाळा येथील गावकऱ्यांनी अवजड वाहतूक गावातून होवू नये यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, शनिवारी पुन्हा अवजड वाहनाने गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकास आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे लहूजी नगरात शोककळा पसरली आहे. पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला अधिक तपास सुरू आहे.