Home latest News वाटमारी प्रकरणातील दुसरा आरोपी मालेगाव पोलिसांच्या जाळ्यात

वाटमारी प्रकरणातील दुसरा आरोपी मालेगाव पोलिसांच्या जाळ्यात

68

वाटमारी प्रकरणातील दुसरा आरोपी मालेगाव पोलिसांच्या जाळ्यात

वाटमारी प्रकरणातील दुसरा आरोपी मालेगाव पोलिसांच्या जाळ्यात

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
✍अजय उत्तम पडघान✍
🪀7350050548🪀
वाशिम /मालेगांव

मालेगाव : – मालेगांव पोलिसांनी 2021 मध्ये घडलेल्या वाटमारी प्रकरणातील दुसरा आरोपी ट्रान्स्फर कारवाई करत अकोला जेल मधुन ताब्यात घेतला आहे.

मागील 8 एप्रिल 2021 रोजी संदेश गंगाराम देवकर वय वर्षे 52 यांचे सोबत वाटमारी करण्यात आली होती त्याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालेगांव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा 119 / 2021 दाखल करून भादवि च्या 392, 34 कलमान्वये अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गजानन तडसे करीत होते. त्यांनी कसोशीने तपास करत फिर्यादी च्या मोबाईल चा आईएमए नंबर ट्रेस करून प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले व या प्रकरणातील आरोपी प्रशांत विष्णू ढगे वय 23 वर्षे राहणार पातुर याला 7 जुन रोजी अटक केली. प्रशांत ढगे ने केलेल्या गुन्ह्याची कबुली देत साथीदाराचे नांव सांगितल्या पासुन मालेगांव पोलिस आरोपींचा कसोशीने शोध घेत होते. दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक गजानन तडसे यांना माहिती मिळाली की सदर आरोपी अकोला जेल मध्ये आहे. त्यामुळे त्यांनी ट्रान्स्फर कारवाई करत पोलिस हेड कॉन्स्टेबल भिमराव चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांना आरोपीला ताब्यात घेण्यासाठी रवाना केले. आज सदर आरोपी गजानन भास्कर अवचार वय 32 वर्षे राहणार पातुर याला न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे उपविभागीय पोलीस अधिकारी, सुनिल कुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगावचे ठाणेदार किरण वानखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिपकुमार राठोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक रवी सैबेवार, पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास कोकाटे, भीमराव चव्हाण, गजानन झगरे, प्रशांत वाधनकर, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी केली आहे.✍