Home latest News वेळेवर बस येत नसल्याने शिंदाड येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित.

वेळेवर बस येत नसल्याने शिंदाड येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित.

67

वेळेवर बस येत नसल्याने शिंदाड येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित.

वेळेवर बस येत नसल्याने शिंदाड येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित.
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा :- पाचोरा तालुक्यातील शिंदाड हे गाव मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावातून जवळपास
३५ ते ५० विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पिंपळगाव हरेश्र्वर येथे ये जा करतात परंतु पाचोरा आगारप्रमुखाच्या मनमानी कारभारामुळे पाचोरा तालुक्यातील खेडेगावातील बससेवा ही नियमीत व सोयीच्या वेळेनुसार नसल्याने शाळेकरी विद्यार्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शिंदाड येथील जवळपास ३५ ते ५० विद्यार्थी शिंदाड येथून पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील शिक्षण घेण्यासाठी जातात तसेच या मुलांची शाळा सकाळी साडे सात वाजता भरत असल्याने या मुलींना शिंदाड येथून पिंपळगाव हरेश्र्वर येथे जाण्यासाठी सकाळी सहा ते साडे सहा वाजेच्या सुमारास शिंदाड येथून पिंपळगाव हरेश्र्वर जाण्यासाठी एसटी बस पाहिजे आहे परंतु वारंवार
ग्राम पंचायत वतिने
अर्जफाटे व तक्रार करुनही पाचोरा आगार प्रमुख ह्या वेळेवर एसटी बस देत नसल्याने शिंदाड येथील विद्यार्थी विद्यार्थीनीं वैतागून आज दिनांक २ जूलै रोजी एसटी बस अडवून धरत आम्हाला वेळेवर बस पाहिजे अशी मागणी केली .याच गोंधळात अचानक झालेल्या बस रोखो आंदोलनामुळे गाडीतील प्रवासी हतबल झाले होते म्हणून गावातील काही सुज्ञ नागरिकांनी मध्यस्थी करून एसटी बसला जाऊ देण्यासाठी विद्यार्थी ची समजूत काढली विद्यार्थी ऐकुन घेत येत्या दोन दिवसात आम्हाला वेळेवर एसटी बस न मिळाल्यास आम्ही शिंदाड या गावावरून एकही एसटी बस जाऊ देणार नाही असे सांगितले आहे
पाचोरा आगार प्रमुख यांच्याशी दूरध्वनीवरुन बोलले असतांना त्यांनी असेल सांगितले कि माझी तब्येत बरोबर नसल्याने येत्या सोमवार पर्यंत मी गाडी पाठवण्याचा निर्णय घेते. असे पाचोरा आगार प्रमुख नीलिमा बागुल यांनी सांगितले आहे