Home latest News चंद्रभगा नदीचा पात्रात नागपुर चा दोन तरुणा चा मृत्यू

चंद्रभगा नदीचा पात्रात नागपुर चा दोन तरुणा चा मृत्यू

77

चंद्रभगा नदीचा पात्रात नागपुर चा दोन तरुणा चा मृत्यू

चंद्रभगा नदीचा पात्रात नागपुर चा दोन तरुणा चा मृत्यू

✍त्रिशा राऊत ✍
नागपुर ग्रामीण प्रतिनिधी
9096817953

नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या नागपूर येथील दोन तरुणांचा चंद्रभागेच्या पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.ही चंद्रभागा नदी येथील जुन्या दगडी पुलाजवळ घडली. मृत्यू झालेले दोन्ही युवक नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील होते. सचिन शिवाजी कुंभारे (28, रा. जलालखेडा) आणि विजय सिद्धार्थ सरदार (27, रा. भारसिंगी) मृत तरुणांची नावे आहेत.नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा व भारसिंगी येथील तीन युवक आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपुरात पोहचले. आंघोळ करुन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, असे त्यांनी ठरवले. सचिन आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला, पण चंद्रभागा नदीला पाणी जास्त असल्यामुळे सचिनला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी विजयने नदीत उडी घेतली. त्यालाही पोहणे येत नसल्याने तोही पाण्यात बुडू लागला. यावेळी काठावर बसलेल्या मित्राने आरडा-ओरडा करत त्यांना वाचवण्यासाठी लोकांना बालवू लागला. तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्या दोघांना बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण डॉक्टरांनी या दोघांना मृत्यू घाषित केले. घटनेचा तपास पंढरपूर पोलिस करीत आहेत. या घटनेने नरखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.