गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम स्कूल इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थीने पन्हळघर येते सीड बॉल टाकून वृक्षारोपण साजरा केले
✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞
माणगांव :- दि १६ जुलै रोजी गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम स्कूल माणगांव च्या वतीने खास असे
वनक्षेत्र भेटीचे आयोजन लोणेरे पन्हळघर बुद्रुक येते करण्यात आले. या क्षेत्रभेटीचे खास वैशिष्ट म्हणजे वनविभाग रोहा याच्या मार्गदर्शनाखाली तसेच शृखला टीम याच्या समवेत मुलानं कडून सीड बॉल टॉसिंग करून घेण्यात आले.
गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम च्या वतीने प्रथमता वनक्षेत्त्रक अधिकारी श्री दिपक तेटगुरे, रुपाली तेटगुरे, सुनीता वाढजे, अनिल मोरे, हरेंद्र पालकर व शुखला टीम चे सहकारी अस्मिता शर्मा, ममता मेहता हर्षाली काळे, केतकी धामणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर वनक्षेत्र अधिकारी श्री दिपक तेटगुरे यांनी वागरे इंग्लिश मेडीयम स्कूल ९ वी व १० वी च्या विध्यार्थीना मोलाचे मार्गदर्शन केले जगलं आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत एक झाड तोडण्यासाठी थोडासा अवधी लागतो पण ते वाढविण्यासाठी किती वेळ लागतो याबद्दलची जाणीव मुलांना या उपक्रमातुन करून देण्यात आली तसेच पाणी हेच आपले जीवन आहे.पिण्याचे पाणी वाचविण्यासाठी अनेक उपक्रम आहेत हे मार्गदर्शन वनशेत्रअधिकारी दिपक तेटगुरे याच्या कडून देण्यात आले.
या उपक्रमांत गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम स्कूल च्या शिक्षिका हर्षदा फेरवाणी मॅडम, स्नेहल रातवडकर मॅडम, साधना गावंडे मॅडम,अलींना चिलवान मॅडम , संध्या साने मॅडम तसेच सहशालेय कर्मचारी यांनी सुद्धा हिरहिरीने सहभाग घेतला होता.त्याच प्रमाणे ९वी १० विच्या विद्यार्थीनी उत्तम असा प्रतिसाद दिला सीड बॉल टॉसिंग पासून वृक्ष रोपण कस करावे हे ही शिकले त्याच प्रमाणे भूगोल क्षेत्र भेटीचा आयोजन कसे असते हे मुलांना समजवून सांगितले.