माणगांव तालुका प्रेस क्लबने केला आदर्श शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन सन्मान.

✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞
माणगांव :-रायगड जिल्हा प्रेस क्लब आयोजित माणगांव तालुका प्रेस क्लबच्या माद्यमातून दरवर्षी शेताच्या बांधावर जाऊन देण्यात येणारा आदर्श शेतकरी व प्रगत शील शेतकरी हा पुरस्कार २०२२ या वर्षी इंदापुर विभागातील भुवन या ग्रामपंचायती मधील मु.विठ्ठल नगर या गावातील प्रगत शील शेतकरी चिंतामणी रावजी यादव,तसेच निवी मुठवळी ग्रामपंचायती मधील मु. उमरोली दिवाळी या गावातील प्रगत शील शेतकरी भोलीनाथ बाबू साळवी यांना रवीवार दि.१७ जुलै रोजी उपस्थित मान्यवर रायगड जिल्ह्यातील नामवंत उद्योजक तसेच लोक शक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष व माणगांव तालुका प्रेस क्लबचे कायदेशीर सल्लागार डाँ.संजय सोनावणे तसेच भुवन ग्रामपचायतीच्या सरपंच दिशा जाधव,रायगड प्रेस क्लबचे सहसचिव पदमाकर उभारे,माणगांव तालुका प्रेसक्लब अध्यक्ष संतोष सुतार,कार्यअध्यक्ष गौतम जाधव, उपाध्यक्ष आरती म्हामुणकर, खजिनदार सचिन वनारसे, सचिव हरेश मोरे,विनोद सापले, पुनम धूमाळ, माणगांव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते लोक शाहीर लोक कवी गोंविद शिंदे,पाणसईचे माजी सरपंच विलास शिंदे,अकुश उडरे, माजी उपसरपंच नितिन शिर्के,सदस्य भास्कर यादव,राम येलकर तसेच विठ्ठल नगरचे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संखेने उपस्थिती होते तसेच इंदापुर विभागातील उमरोळी दिवाळी या गावचे प्रगत शिल शेतकरी भोलीनाथ साळवी यांना देखील पुरस्कार देताना युवा क्रांती संघ(रंजि)डेव्हलपमेंट सेटरचे अध्यक्ष संदेश सोनावणे, सकल्पना संस्थापक,सुनील कदम,नितिन साळवी यावेळी उपस्थित होते तसेच विठ्ठल नगर येथील रायगड भुषण पुरस्कार प्राप्त गोंविद शिंदे यानी आपले मनोगत व्यक्त करताना म्हाणाले की आमच्या गावातील प्रगत शील शेतकरी चिंतामणी यादव यांना मिळालेला आदर्श पुरस्कार तो त्यांना मिळालेला नसून तो समस्त विठ्ठल नगर ग्रामस्थाना मिळाला असे मला वाटत असून रायगड प्रेस क्लब तसेच माणगांव तालुका प्रेस क्लबच्या उपक्रमा बाबत आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानत आहोत.








