जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे एकांबा गावातील लाईन खांब (पोल) गेले वाहून…….
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀 7350050548🪀
वाशिम,: – जिल्ह्यात गेले दोन -तीन दिवस सारखा पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा जून महिना कोरडा गेला,पण जुलैच्या सुरूवातीपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. वाढत्या पावसाच्या जोरामुळे बरेच नुकसान होतांना दिसत आहे तसेच जिवितहानी पण होत आहे.
या पावसामुळे वाशिम तालुक्यातील एकांबा पो . अनसिंग या गावातील पूल व लाईनचे खांब वाहून गेले. आणि त्याच बरोबर पुस नदिच्या महापुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या पावसामध्ये गावातील तीन लाईन खांब (पोल) वाहून गेले. त्यामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.तांडयाला लागणारा पूल पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेला. त्या पुलाची तक्रार गावकऱ्यांनी केली होती पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
तसेच या जोरदार पावसामुळे शेताकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. गावकऱ्यांना स्वतः चा जीव धोक्यात घालून शेतात जावं लागतं आहे. तरीही याकडे सरकारने लक्ष द्यावे.








