Home latest News नागभीडात अघावत जलतरण तलावाची उभारणी. —— युवकांन मध्ये उत्साहाचे वातावरण,16 आँगस्टला 2022...

नागभीडात अघावत जलतरण तलावाची उभारणी. —— युवकांन मध्ये उत्साहाचे वातावरण,16 आँगस्टला 2022 होणार शुभारंभ .

68

नागभीडात अघावत जलतरण तलावाची उभारणी. —— युवकांन मध्ये उत्साहाचे वातावरण,16 आँगस्टला 2022 होणार शुभारंभ .

नागभीडात अघावत जलतरण तलावाची उभारणी. ------ युवकांन मध्ये उत्साहाचे वातावरण,16 आँगस्टला 2022 होणार शुभारंभ .

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभीड—- नागभीड येथे आघावत जलतरण तलावाची उभारणी करण्यात आली असल्याने येथिल युवकांन मध्ये उत्साहाचे वातावण निर्माण झाले आहे. या जलतरण तलावाचे शुभारंभ 16 आॕगस्ट 2022रोजी महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.नागभीड नगरपरिषद होऊन जेमतेम पाच वर्षाचा कालावधी पुर्ण झाला आहे.येथिल सत्ताधारी गटाने अनेक विकासात्मक कामे केली असुन,नागभीड नगरपरिषद परिसरातील युवकांन साठी नागभीड येथे अघावत कृञिम जलतरण तलाव असावे यासाठी येथिल नगरपरिषदच्या सत्ताधारी गटाने प्रयत्न करुन आम.किर्तीकुमार भांगडीया यांच्या मार्फत ते करुन घेतले आहे आम.भांगडीया यांनी सुद्धा याकडे विशेष लक्ष दिले आहे.नागभीड तालुक्यात अनेक मोठ-मोठी तलावे आहेत, येथिल युवक जलतरण करण्यासाठी जात असतात पण प्रसंगी कधीकाळी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याच प्रमाणे तालुक्यात सुप्रसिद्ध घोडाझरी तलाव आहे.पण गेल्या चार वर्षाआधी अभ्यारण्य घोषित झाल्याने या परिसरात तसेच तलावात जलतरण करण्यावर बंदी घातली आहे.तरी सुद्धा या तलावाचा ओव्हफ्लो निघाल्यास युवक मोठ्या प्रमाणात जलतरण करीत असल्याचे चिञ दिसते,जलतरणा सारखा व्यायाम नाही त्यामुळे युवक सकाळी कुठल्याना कुठल्या तलावात जलतरण करण्यासाठी जात आहेत.त्यांच्या सुरक्षे साठी हा जलतरण तलाव शहाराच्या बाहेर 1 कि.मि.अंतरावर शिवटेकडी च्या रोडवरती आहे.या अघावत जलतरण तलावाची उभारणी जिल्हा खनिज विकास निधी मधुन 1करोड 74 लाख रुपये खर्च करण्यात आला.ह्या जलतरण तलावात अघावत स्थानगृहाची निर्मीती करण्यात आली असुन चारही बाजुने संरक्षण भिंती बांधल्या आहेत.यामध्ये पुरुष आणी महीलांन साठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.या तलावात तिन ते सहा फुट खोल अशी पाण्याची व्यवसाय करण्यात आली आहे.लवकरच या जलतरण तलावाचे शुभारंभ होऊन,नागभीड येथिल नगरपरिषद कडे त्याचा मालकी ताबा देण्यात येणार आहे.त्या नंतर हे जलतरण तलाव सुरु करण्यात येणार आहे.