Home latest News गणपति वप्प मोरियं ‘हाऊसफुल्ल ‘उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट प्रतिसाद

गणपति वप्प मोरियं ‘हाऊसफुल्ल ‘उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट प्रतिसाद

75

गणपति वप्प मोरियं ‘हाऊसफुल्ल ‘उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट प्रतिसाद

गणपति वप्प मोरियं 'हाऊसफुल्ल 'उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट प्रतिसाद

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६९८६०५३०

ऐरोली- दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता मैत्रेय संघ निर्मित,सिद्ध आर्ट प्रणित आणि अद्वैत थिएटर प्रकाशित गतपति वप्प मोरियं नाटकाचा प्रयोग श्रीमती जानकीबाई कृष्णा मढवी मंगल कार्यालय,ऐरोली येथे आयोजित करण्यात आला होता.

सदर प्रयोगास प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला.अतिशय दर्दी असलेल्या प्रेक्षकांनी रंगलेल्या प्रसंगांना उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट करुन भरभरून दाद दिली.

भारतीय इतिहासातील सोनेरी काळ ,अर्थाय मौर्य काळ उलगडून दाखवणारं हे नाटक आहे.चक्रवर्ती सम्राट अशोक आपल्या प्रजेची कशी पुत्रवत काळजी घेत,धम्म प्रचारासाठी त्यांनी काय काय प्रशंसनीय कामे केली ,त्यांची शासनव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यावर प्रकाश टाकणारे हे दोन अंकी नाटक प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतेच ,पण इतिहासातून पुसून टाकलेला समृद्ध मौर्य काळ अतिशय प्रभावीपणे मांडते.सर्वांनी आवर्जून पाहावे असे हे नाटक आहे.या नाटकाचा पुढील प्रयोग सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.हा ही प्रयोग हाऊसफुल्ल होईल असा आयोजकांना आणि निर्मात्यांना विश्वास आहे.

लेखक-गीते- बाळासाहेब थोरात
दिग्दर्शक/नेपथ्य -अरुण कदम
संगीत-प्रविण डोणे/प्रितेश मांजलकर
पार्श्वसंगीत/प्रकाशयोजना -अक्षय धांगट
रंगभूषा-उदयराज तांगडी
वेशभूषा -गणेश मांडवे