Home latest News दिवाळीपूर्वी कर्मचार्‍यांना मिळणार ऑक्टोबरचे वेतन, विमाशिसंघाच्या निवेदनाचे फलीत 

दिवाळीपूर्वी कर्मचार्‍यांना मिळणार ऑक्टोबरचे वेतन, विमाशिसंघाच्या निवेदनाचे फलीत 

67

दिवाळीपूर्वी कर्मचार्‍यांना मिळणार ऑक्टोबरचे वेतन, विमाशिसंघाच्या निवेदनाचे फलीत 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर, 19 ऑक्टोबर: ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबरचे वेतन दिवाळीपूर्वी करण्यात यावे, अशीमागणी सर्वात आधी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शासनाकडे केली होती. ही मागणी 18 ऑक्टोबरला शासन निर्णय निर्गमित करुन पूर्ण केल्यामूळे राज्यातील कर्मचार्‍यांचे व सेवानिवृत्तांचे माहे ऑक्टोबरचे वेतन व निवृत्ती वेतन दिवाळीपूर्वी होणार आहे. विमाशिसंघाची ही मोठी उपलब्धी असल्याची माहिती विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस. जी. बरडे व सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षणमंत्री व प्रधान सचिव यांना 26 सप्टेंबर 2022 ला लेखी निवेदन सादर करुन ही मागणी केली होती. त्या अनुषंगाने हा शासन निर्णय निर्गमित केला असल्याचे विमाशिसंघाच्या प्रांतीय व जिल्हा पदाधिकार्‍यांनी सांगितले. हा निर्णय दोन दिवस आधी घेतला असता, तर अधिक चांगले झाले असते, अशी खंतही बरडे व अडबाले यांनी व्यक्त केली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात ऑक्टोबरचे वेतन करण्यासाठी आर्थिक निधी कमी पडत असल्यामुळे आर्थिक निधी त्वरित पाठविण्यात यावा, अशी मागणीही याप्रसंगी विमाशिसंघाच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.