लेखक एम. एस. जाधव यांच्या ‘हरवलेले बालपण’ या काव्यसंग्रहाची राष्ट्रीय पुरस्कारसाठी निवड

44

लेखक एम. एस. जाधव यांच्या ‘हरवलेले बालपण’ या काव्यसंग्रहाची राष्ट्रीय पुरस्कारसाठी निवड

लेखक एम. एस. जाधव यांच्या 'हरवलेले बालपण' या काव्यसंग्रहाची राष्ट्रीय पुरस्कारसाठी निवड

पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. ८१४९७३४३८५

जोगेश्वरी :- लेखक एम. एस. जाधव तथा कवी बाबा जाधव यांनी संपादित केलेल्या ‘हरवलेले बालपण’ या प्रतिनिधिक बालकवीता संग्रहाला हिंगोली येथील समृद्धी प्रकाशनच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय संत नामदेव संपादण साहित्य पुरस्कारासाठी निवड झाल्याचे संयोजक व मराठी विभागप्रमुख डॉ. प्रा. श्रीराम कराळे यांनी पत्राद्वारे कळवले आहे. या पुरस्काराचे वितरण हे येत्या २२ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे.
चिरंजीव अथर्व याच्या स्मृतिप्रीतर्थ महाराष्ट्रातील ज्येष्ठ तसेच नवकवी यांनी लिहलेल्या ११५ बालकवीतांचा प्रतिनिधिक कवितासंग्रह श्री. एम. एस. जाधव यांनी अभ्यासपूर्ण आशयासह संपादित केला आहे. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आणि उत्कृष्ठ ग्रंथनिर्मितीबद्दल सदर पुरस्काराने यथोचित सन्मान केला आहे. यापूर्वी ‘प्रश्न तेच पाऊलवाटा नव्या ‘या वैचारिक पुस्तकाला व ‘भूक’ या काव्यसंग्रहाला अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कोरोनाच्या महामारीत बालकांच्यासाठी प्रस्तुतचे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल श्री. एम. एस. जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.