तीन दशकानंतर पुनर्मिलंन–
आशादायी विचारात संपन्न झाला स्नेहसंमेलन सोहळा.

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मोबाईल नंबर : 9860020016
भद्रावती: आज जीवनाशी पुन्हा भेट झाली या उक्ती प्रमाणे जि. प. हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज भद्रावती 1992 आणि 1994 बॅच चा स्नेहसंमेलन सोहळा मुरली पाटील गुंडावार लाँन येथे 25 डिसें 2022 रविवारला संपन्न झाला.
आपल्या जीवनातील कडू-गोड आठवणीला उजाळा देत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे 90 वर्गमित्र-मैत्रिणी एकत्र येऊन
आपल्या आयुष्यातील अनमोल आणि अदभुत क्षणाचा आनंद घेतला.या सोहळ्यास 1992 बॅचचे याच शाळेचे माजी विद्यार्थी असलेले आणि क्षेत्राचे खासदार श्री. बाळूभाऊ धानोरकर आवर्जून उपस्थित राहले आणि त्यांनी आपल्या सर्व वर्गमित्रांची आणि गुरुजनांची आस्थेने विचारणा केली. त्यांनी आपल्या सहचारिणी आणि क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनाही बोलावून सर्वांशी गाठभेट घडवून आणली, हा आम्हा सर्व वर्गमित्रांसाठी सुखद क्षण होता.तीन दशकानंतर भेटलेले मित्र आणि त्यांचे प्रेरणादायक विचार आणि सहवास आम्हा सर्वांना नवसंजीवनी देऊन गेला.
या स्नेहसंमेलन सोहळ्यास विद्यालयाचे माझी मुख्याध्यापक श्री गावंडे सर हे अध्यक्ष स्थानी होते त्याच सोबत पवार सर,वासनिक सर, सावरकर सर, भोयर सर, श्रीवास्तव सर, बल्लामवार सर, दोनाडकर सर, ताजने सर, भालेराव मॅडम,किटे मॅडम, सरपटवार सर, चौधरी सर हे उपस्थित होते.
हा सोहळा पार पाडण्यासाठी स्थानिक वर्गमित्रांनी मोलाचा वाटा उचलला आणि सोहळा यशस्वी केला त्यात सर्वांची विशेष मेहनत आणि कसब दोन्ही होते.








