अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या शिक्षकाला नागपुरात अटक;

✍ त्रिशा राऊत ✍नागपूर जिल्हा ग्रामीन प्रतिनिधि
मो 9096817953
ट्युशन क्लासमध्ये शिकण्यासाठी येत असलेल्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला स्पर्श करून अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपी शिक्षकास तहसील पोलिसांनी अटक केली आहे.प्रकाश रंजीत निखारे (वय 32, टिमकी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तहसील पोलिस (Nagpur Police) ठाण्यांतर्गत 38 वर्षाच्या फिर्यादी महिलेची नववीला शिकत असलेली 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी ऑगस्ट 2022 ते 28 डिसेंबर 2022 दरम्यान कोचिंग क्लासमध्ये ट्युशनला जात होती. ती ट्युशनवरून उशिराने परत येत असल्यामुळे तिच्या आईने तिला उशिरा येण्याचे कारण विचारले असता, तिने कोचिंग क्लासचे सर माझा गणित विषयाचा एक्स्ट्रा क्लास घेत असल्याचे सांगितले. मुलीला मोबाइलवर आरोपी शिक्षकाशी चॅटिंग करताना पाहून तिच्या आईला संशय आला. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यावर मुलीने तिचे कोचिंग क्लासमधील शिक्षक शिकवताना स्पर्श करतात आणि त्यांनी अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याचे सांगितले, त्यावर अल्पवयीन मुलीची आई मुलीला घेऊन शिक्षकाला जाब विचारण्यासाठी गेली असता, आरोपी शिक्षकाने मुलीच्या गालावर चापट मारली होती. त्यानंतर आईने मुलीसह आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.








