Home latest News जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

93

जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पूनम पाटगावे
मुंबई प्रतिनिधी

मुंबई :- सामाजिक क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेल्या मुंबईच्या जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन रविवार दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी दादर पूर्व येथील आरजु सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक तसेच मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉ. राम नेमाडे, कामगार नेते श्री.अविनाश दौंड, श्री.जनार्दन जंगले शिक्षक नेते , दैनिक आपलं महानगर चे संपादक संजय सावंत, आरोग्य सेवेतील अधिकारी डॉ. अविनाश भागवत, जॉय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व निभावणाऱ्या सामाजिक घटकांचा, पत्रकार, वृत्तपत्रलेखक, आदर्श शाळा तसेच संस्थेच्या सभासदांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थापक गणेश हिरवे यांनी संस्थेची निर्मिती, वाटचाल, भूमिका व आगामी संकल्पनांविषयी माहिती दिली. विचारमंचावरील सर्वच प्रमुख अतिथींनी जॉय ऑफ गिव्हिंग करत असलेल्या कार्याचा गौरव करत संस्थेमध्ये निस्वार्थीपणे एक टीम म्हणून करत असलेल्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या सर्व सभासदांसह, पत्रकार, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आरसा दाखवणाऱ्या कार्य अहवालाचे तसेच टी-शर्टचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या कार्याचा मागोवा घेणारी कविता वैभव पाटील यांनी यावेळी उपस्थितांसमोर सादर केली. डॉ अविनाश भागवत यांनी पुढील महिन्यात होत असलेल्या आपल्या मुलाच्या लग्नकार्यातून बचत करत आर्थिक मदतीचा धनादेश याप्रसंगी संस्थेच्या कार्यासाठी प्रदान केला.
या कार्यक्रमप्रसंगी आदर्श शाळा, आदर्श पत्रकार पुरस्कार पत्रकारितेतील उत्तुंग कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते या सर्वांना शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या सर्व सभासदांना एकत्र आणून तसेच समाजातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या गुणरत्नांना गौरवत संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे सांगत उपस्थित सर्वांनीच संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार हिरवे सरांनी मानले. उपस्थित सर्वांसाठी यावेळी सुग्रास भोजनव्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. कार्यक्रमाची सांगता शेवटी राष्ट्रगीताने करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासठी जॉय च्या सर्व कार्यकर्त्यानी खूप मेहनत घेतली.