Home latest News भगवान बुद्धाच्या ऐतीहासिक मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा • नवबौध्द...

भगवान बुद्धाच्या ऐतीहासिक मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा • नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्घुसची मागणी

77

भगवान बुद्धाच्या ऐतीहासिक मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा

• नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्घुसची मागणी

भगवान बुद्धाच्या ऐतीहासिक मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा • नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्घुसची मागणी

🖋️ साहिल सैय्यद
📱93079 48197

घुग्घुस : 2 जानेवारी
येथील नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समिती आणि बौद्ध सर्कल समितीच्या वतीने सोमवार, १ जानेवारी रोजी भद्रावती तालुक्यातील विज्जासन येथील तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यासाठी घुग्घुस पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

विज्जासन येथील तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीची विटंबना केल्याने समस्त बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत.
हे गैरकायदेशीर कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचा तत्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी दोषी व्यक्तींवर कारवाई न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.

यावेळी समितीचे बंडू रामटेके, बबलू सातपुते, सुजित सोनटक्के, भिमेंद्र कांबळे, अमित बोरकर, बाबा आमटे, मनोहर कवाडे, नागेश पथाडे, शाम कुम्मरवार, भारत साळवे, अमृत सोदारी, गंगाधर गायकवाड, बालाजी पतंगे, धीरज ढोके, सचिन वैरागडे, सुमेध पाटील, पूजा दुर्गम, दीप्ती सोनटक्के, सुजाता सोनटक्के, योगिता मुन, सुमित्रा गाडगे, माया सांड्रावार, सविता मंडपे, प्रांजली मुन व मोठ्या संख्येत समाज बांधव उपस्थित होते.