देवघर येथील माजी उपसरपंच शाखाप्रमुख, यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थ महिला भगिनींनी केला”शिवसेना उपनेते पक्ष प्रतोद आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश-
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
महाड :-महाड तालुका वाळण विभाग देवघर गावातील माजी उपसरपंच तसेच वरदानीमाता कब्बडी असोसिएशन वाळण विभागाचे अध्यक्ष श्री.जितेंद्र शेडगे , गेणू शेडगे, भिवा शेडगे. दिपक शेडगे, सुरेश शेडगे, यशवंत गोरे, संभाजी शिंदे, रमेश सुतार, कांतिलाल भिलारे, नवीन सुतार यांच्यासह उबाठा मधील संपूर्ण ग्रामस्थ महिला भगिनींनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी देवघर ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आमदार गोगावले यांनी सांगितले की गावातील सर्व विकासकामे आपल्या माध्यमातून झाली असुन जी काही विकासकामे रखडली असतील ती आचारसंहिता संपल्याबरोबर कामाचा शुभारंभ केला जाईल ,तसेच आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही, माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाड विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे होत आहेत महाड विधानसभा मतदारसंघाचा झपाट्याने विकास होताना दिसत आहे त्यामुळे गावेच्या गावे शिवसेनेत प्रवेश करत आहेत.या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित मा.जि.प. सदस्य संजय कचरेसाहेब, शिवसेना महाड तालुका संघटक संजयशेठ शिंदे, शिवसेना उपविभाग प्रमुख अशोक शिंदे, वाळण विभाग संपर्क प्रमुख गणेश मोरे माजी सरपंच रवींद्र कालगुडे, बळीराम कालगुडे, परशुराम गायकवाड, नामदेव कोंडलकर, युवासेना महाड तालुका सरचिटणीस शेखर राखाडे, युवासेना बिरवाडी जि.प. संपर्कप्रमुख अमर जंगम, युवासेना वाळण विभाग प्रमुख सचिन मोरे, संपर्क प्रमुख संभाजी कालगुडे, सहसंपर्क प्रमुख शरद पोटे, नागेश कोंडलकर, प्रफुल्ल कालगुडे, अंकुश पोटे, नितीन चौधरी, अनंत शिंदे, दिनेश शिंदे, निखिल शिंदे, लौकिक शिंदे, राजेश सुतार, गगनेश दूधाने , तुषार कालगुडे, विजय मोरे, भागोजी शेडगे, राजाराम मोरे, राकेश घाग, अनिल पवार, राहुल शिंदे, सागर शेलार, दर्शन शिंदे तसेच या विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.