Home latest News सोमय्या पॉलीटेक्नीक येथे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

82

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

सोमय्या पॉलीटेक्नीक येथे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 10 जून
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज, वडगाव येथे प्लेसमेंट भरती चे आयोजन करण्यात आले होते. अल्मिगेट ऑटो अंसिल्लारी प्रायवेट कंपनी मध्ये २१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच मेकॅनिकल ब्रँच,कॉम्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम्युनिकेशन , इलेक्ट्रिकल ब्रँच मधील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचीही कॅम्पस प्लेसमेंट मध्ये निवड करण्यात आली. त्यामध्ये आय. टी,आय. च्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता.
प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्या, एकूण पदे, दिले जाणारे पगार यांच्यात, गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसा फरक दिसून आला नाही. विद्यार्थीही याबाबत समाधानी दिसून आले.त्याच क्षेत्रातल्या अगदी फ्रेशर विद्यार्थ्यांचीही निवड कंपन्या करत आहेत.
एप्टिट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, मुलाखत यातून निवड झालेले विद्यार्थी कामावर रुजू झाल्यावर आधी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. कामाशी निगडित गोष्टी, सॉफ्टवेअर इत्यादींचं प्रशिक्षण दिलं जातं. कॉलेजमधून बाहेर पडताना मुलांच्या हातात किमान एक तरी जॉब ऑफर असावी यासाठी प्लेसमेंट झटत असतो. प्लेसमेंट कंपनी आयोजित केलेले सेमिनार आणि कार्यशाळांना विद्यार्थ्यांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद यामुळे मुलांना नोकरीसाठी झगडावं लागतं. तरी याबाबत मुलांनी सुरुवातीपासून सजग असावं अशी अपेक्षा अनेक कॉलेजच्या प्लेसमेंट कंपनी प्रमुखांनी व्यक्त केली आहे. यावेळी प्राचार्य जमीर शेख ,उपप्राचार्य दीपक मस्के आणि शिक्षक उपस्थित होते.