कमी दाबाच्या वीजपुरवठयामुळे 22 मोटारी जळाल्या

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चिमूर : 11 जून
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उमा नदीपात्रात नगरपरिषदेचे 11 पंपहाऊस लावण्यात आले. मात्र, पुरेशा क्षमतेचा वीजपुरवठा होत नसल्याने मागील पाच महिन्यात 22 मोटारी जळाल्या. त्यामुळे पाणी पुरवठा करताना वारंवार अडचणी येत आहेत. चिमूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उमा नदीवर सोनेगाव बेगडे येथे दोन पंप हाऊस सुरू आहेत. याच नदीवर बाह्मणी, काग, सोनेगाव बेगडे, कवडसी येथेही 11 पंपहाऊस व ट्यूबवेल आहेत. या पंप हाऊसमधून उमा नदी पात्रातून पाणी उपसा करून पाण्याच्या टाक्यात साठवणूक करून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा योजनेसाठी 11 पंपहाऊस व ट्यूबवेलद्वारे उपसा करण्यासाठी विविध क्षमतेच्या मोटारी लावल्या आहेत.








