Home latest News दारु गोळा बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याने पाच जणांचा मृत्यू तर पाच जण...

दारु गोळा बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याने पाच जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर .

84

दारु गोळा बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याने पाच जणांचा मृत्यू
तर पाच जण गंभीर .

दारु गोळा बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याने पाच जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर .

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953

नागपूर.नागपूर शहरातील धामणा या परिसरात चामुंडा एक्सप्लोसिव्ह ही दारु गोळा तयार करणारी कंपनी असून गुरुवारी (13 जून) दुपारी दीड वाजताच्या सुमारास या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट झाला त्यावेळी या कंपनीमध्ये 10 ते 12 कामगार काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यात पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला, पाच जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनी परिसरात एकच गर्दी केली आहे. तसेच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली आहे. परंतु कंपनीत मोठ्या प्रमाणात स्फोटक असल्याने आतमध्ये कुणालाही सोडण्यात आलेले नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनीही घटनास्थळाला भेट दिली.एका पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. कामगारांनी स्फोटकांचा स्टॉक बनवला होता. हा स्टॉक 24 तासांनी दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार होता. पण स्टॉकमध्ये स्पार्क झाला की आग लागली यासंदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण या स्फोटात चार ते पाच लोकांचा मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहित समोर येत आहे. तसेच चार ते पाच लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आम्ही त्याठिकाणी जात आहोत. दरम्यान, कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर परिसरात तणावाची परिस्थिति निर्माण झाली आहे. कंपनीतील स्फोटाच्या विरोधात नागरिकांनी नागपूर-अमरावती महामार्गावर चक्काजाम केला. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतले आहे.