Home latest News रायगड जिल्ह्यातील 54 हजार 208 पदवीधर बजावणार मतदानाचा हक्क

रायगड जिल्ह्यातील 54 हजार 208 पदवीधर बजावणार मतदानाचा हक्क

74

रायगड जिल्ह्यातील 54 हजार 208 पदवीधर बजावणार मतदानाचा हक्क

रायगड जिल्ह्यातील 54 हजार 208 पदवीधर बजावणार मतदानाचा हक्क

अलिबाग
रत्नाकर पाटील
९४२०३२५९९३

अलिबाग :- कोकण विभाग पदवीधर निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान होत आहे. 2018 च्या तुलनेत यावेळी कोकणात मतदारसंघात पदवीधर मतदारांची दुपटीने वाढ झाली आहे. तर रायगड जिल्हयात तिपटीने मतदार नोंदणी झाली आहे. 2018 मध्ये रायगड जिल्ह्यात सुमारे 19 हजार पदवीधर मतदार होते तर यावेळी 54 हजार 208 मतदारांची नोंदणी झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. जिल्ह्यात कोकण विभाग पदवीधर निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होत आहे. 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मतदार नोंदणीच्या अंतिम मुदतीपर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी वाढविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. सर्वाधिक नोंदणी पनवेल तालुक्यात झाली आहे. पनवेल तालुक्यात 9 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 11 हजार 112, महिला 8956, तृतीय पंथी 3 असे एकूण 20,071 मतदार आहेत. उरण तालुक्यात 2 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 2152, महिला 1672, तृतीय पंथी 1 असे एकूण 3825 मतदार आहेत. कर्जत तालुक्यात 3 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 2437, महिला 1438 असे एकूण 3875 मतदार आहेत. खालापूर तालुक्यात 2 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 1584, महिला 1186, तृतीय पंथी 1 असे एकूण 2771 मतदार आहेत.
पेण तालुक्यात 3 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 3122, महिला 2391 असे एकूण 5513 मतदार आहेत. अलिबाग तालुक्यात 4 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 2349, महिला 1893 असे एकूण 4242 मतदार आहेत. सुधागड तालुक्यात 1 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 695, महिला 496 असे एकूण 1191 मतदार आहेत. रोहा तालुक्यात 2 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 2316, महिला 1675, तृतीय पंथी 2 असे एकूण 3993 मतदार आहेत.
मुरुड 1 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 576, महिला 473 असे एकूण 1049 मतदार आहेत. तळा 1 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 204, महिला 120 असे एकूण 324 मतदार आहेत. माणगाव 2 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 1259, महिला 907 असे एकूण 2166 मतदार आहेत. म्हसळा तालुक्यात 1 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 388, महिला 203 असे एकूण 591 मतदार आहेत. श्रीवर्धन तालुक्यात 2 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 372, महिला 291 असे एकूण 663 मतदार आहेत. महाड तालुक्यात 2 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 1850, महिला 1395, तृतीय पंथी 3 असे एकूण 3245 मतदार आहेत. पोलादपूर तालुक्यात 1 मतदान केंद्र असून तालुक्यात पुरुष 427, महिला 259 असे एकूण 686 मतदार आहेत.
रायगड जिल्ह्यात पुरुष मतदार 30843, महिला 23343 आणि तृतीय पंथी 9 असे एकूण 54 हजार 208 मतदार आहेत. दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघात २८ मे २०२४ पर्यत रोजीची एकूण मतदारसंख्या २ लाख १३ हजार ९१७ इतकी आहे. सन २०१८ ची कोकण या मतदारसंघातील एकूण मतदार नोंदणी ही १ लाख,४ हजार ४८८ इतकी होती.

कोट-
कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे महाविद्यालये, शासकीय कार्यालये, डाॅक्टर, वकील संघटनांसाठी विशेष शिबीर घेण्यात आली. त्याचबरोबर पदवीधर मतदार नोंदणीसाठी पोस्टर्स, बॅनर्स आणि झिंगल्स तयार करण्यात आली होती. पदवीधर मतदार याद्या सातत्याने अद्ययावत करण्यात येत होत्या. त्यामुळे यावेळी रायगड जिल्ह्यात चांगल्या प्रकारे पदवीधर मतदार नोंदणी झाली आहे.
– स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), रायगड

चाैकट-
तालुकानिहाय मतदार
पनवेल- 20071, उरण 3825, कर्जत 3875, खालापूर 2771, पेण 6513, अलिबाग 4242, सुधागड 1191, रोहा 3993, मुरुड 1049, तळा 324, माणगाव 2166, म्हसळा 591, श्रीवर्धन 663, महाड 3245, पोलादपूर 686.