श्री रविप्रभा मित्र संस्था उपाध्यक्ष पदी नरेश विचारे तर सचिव पदी संतोष उध्दरकर यांची निवड

✍️ संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा: श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड या संस्थेची नुकतीच वार्षिक सभा सपन्न झाली. माजी सचिव नितीन रिकामे यांनी सभेमध्ये २०२२ ते २० २३ या वर्षाच्या केलेल्या कामांचे वाचन करण्यात आले व २०२४ ते २०२५ या वर्षी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे देखील सवीत्सर माहिती सांगण्यात आली, या सभेमध्ये अध्यक्ष यांच्या सहमताने नविन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली, या मध्ये उपाध्यक्ष पदी नरेश विचारे तर सचिव पदी संतोष उद्धरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणुन समीर लांजेकर व सुजित काते यांची वर्णी लागली या सर्व नवनिर्वाचितांचे अध्यक्ष रविंद्र लाड यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले, श्री रविप्रभा मित्र संस्थेच्या सचिव पदी माझी निवड करून माझ्यावर खुप मोठी जबाबदारी टाकली आहे.या साठी माझ्याकडुन नक्कीच सहकार्य मिळेल असे सचिव संतोष उध्दरकर यांनी आश्वासित केले व संस्थेचे धन्यवाद मानले, संस्थाला अगदी कमी वेळात तालुक्यात तसेच जिल्हयात उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. आणि संस्थेच्या उद्दिष्य प्रमाणे कामकाज सुरु आहे. ते अतिशय कौतुकास्पद आहे यासाठी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड व सर्व सदस्य यांचे योगदान आहे असे नवनिर्वाचित उपाध्यक्ष नरेश विचारे यांनी सभेपुढे बोलतांना सांगितले. तसेच अध्यक्ष रविंद्र लाड यांनी देखील सभेला संबोधितांना सांगितले व कि ही संस्था तिमिराकडुन तेजाकडे जात असताना मला याचा आनंद होत आहे, तसेच तुमचे सर्वांचे सहकार्य देखील खुप मोलाचे मिळत आहे, जसे आपण गेल्या वर्षी सहकार्य केलेत तसे या ही वेळी आपल्या सर्वांचे सहकार्य लाभेल अशी आशा बाळगतो व पुन्हा एकदा नवनिर्वाचितांचे अभिनंदन करतो. या सभेत खजिनदार सुशांत लाड यांनी होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन केले, तर उपस्थितीतांचे आभार सह सचिव स्वप्नील लाड यांनी मांडले. यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड, उपाध्यक्ष नरेश विचार, सचिव संतोष उध्दरकर, सह. सचिव स्वप्नील लाड, खजिनदार सुशांत लाड, सदस्य दतात्रेय लटके, नितीन रिकामे, संतोष घडशी, तुकाराम भेलेकर, सुजित काते, समीर लांजेकार, किशोर गुलगुले, संदिप रिकामे, शांताराम निंबरे तसेच सर्व सभासद उपस्थित होते.






