Home latest News खा. प्रतिभा धानोरकर यांच्या भावासह 9 जणांवर गुन्हा दाखल • केपीसीएल...

खा. प्रतिभा धानोरकर यांच्या भावासह 9 जणांवर गुन्हा दाखल • केपीसीएल कंपनीच्या अधिकार्‍यांना शिवीगाळ व मारहाण प्रकरण

72

खा. प्रतिभा धानोरकर यांच्या भावासह 9 जणांवर गुन्हा दाखल

• केपीसीएल कंपनीच्या अधिकार्‍यांना शिवीगाळ व मारहाण प्रकरण

खा. प्रतिभा धानोरकर यांच्या भावासह 9 जणांवर गुन्हा दाखल • केपीसीएल कंपनीच्या अधिकार्‍यांना शिवीगाळ व मारहाण प्रकरण

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 20 जून
भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथील केपीसीएल कंपनीच्या कोळसा खाणीतील अधिकार्‍यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे, नीलेश भालेराव यांच्यासह 9 जणांविरुद्ध भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
केपीसीएल कंपनीचे अधीक्षक अभियंता एस. शिवप्रसाद यांच्या लेखी तक्रारीनंतर भद्रावती पोलिसांनी प्रवीण काकडे व इतर आरोपींविरुध्द कलम 143, 147, 149, 353, 294, 506 आणि कलम 332 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी एफआयआरमध्ये 2 आरोपींची नावे नोंदवली आहेत. पोलिस इतर 7 जणांची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत. यासाठी व्हिडिओ फुटेज स्कॅन करण्यात येत आहेत. एस. शिवप्रसाद यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते कर्नाटकातील बेंगळुरू येथील रहिवासी असून, ते केपीसीएल कंपनीच्या बरांज खाणीत अधीक्षक अभियंता म्हणून काम करतात. बुधवार, 19 जून रोजी खासदार प्रतिभा धानोरकर या केपीसीएल खाणीशी संबंधित बरांजवासीयांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर चर्चा करण्यासाठी येत असल्याची माहिती त्यांना ईमेलद्वारे मिळाली होती. या माहितीच्या आधारे ते आपले सह्योगी अधिकारी एचआर हेड सुभाष गोहोकर, डेप्युटी जीएम राजेश वासाडे, सहयोगी उपाध्यक्ष गजानन जिभकाटे यांच्यासह केपीसीएलच्या कार्यालयात उपस्थित होते. सकाळी 11 वाजता खासदार धानोरकर आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यालयात हजर झाल्या. कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेऊन त्यांच्यासोबत कार्यालयाबाहेरील झाडाच्या सावलीत बैठक घेण्याचे ठरले.
एस. शिवप्रसाद यांनी सांगितले की, खासदार धानोरकर यांच्यासोबत आलेले प्रवीण काकडे यांनी त्यांच्यासमोर एक कागद हलवत त्यांना अश्‍लील शब्दात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी मागे असलेल्या व्यक्तीने एस. शिवप्रसाद यांच्या गालावर जोरदार धापड मारली. हा प्रकार पाहून त्यांच्या सोबत असलेले अन्य 7 ते 8 कार्यकर्त्यांनी बाचाबाची सुरू केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून कामगारांच्या तावडीतून त्यांची सुटका केली.
केपीसीएल म्हणजेच कर्नाटक पॉवर कंपनी लिमिटेड ही सरकारी कंपनी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. प्रवीण काकडे, नीलेश भालेराव व इतर 7-8 कामगारांनी त्यांना धमकावून, शिवीगाळ, मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यवस्थापनाच्या सूचनेवरून त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे.