Home latest News *कल्याण मध्ये दुर्गाडी चौकात 5 मिनिटाच्या प्रवासासाठी जवळपास 45 मिनिट*
*कल्याण मध्ये दुर्गाडी चौकात 5 मिनिटाच्या प्रवासासाठी जवळपास 45 मिनिट*
कल्याण 18 सप्टेंबर 2025
हिरामण गोरेगावकर
8689818225
मुंबई :- कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला, गोविंदवाडी बाह्यवळण आणि परिसरातील रस्त्यावर गुरूवारी दुपारपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. या कोंडीचा फटका कल्याण शहरांतर्गत वाहतुकीला बसला आहे.दुर्गाडी येथे दुर्गाडी देवीचा नवरात्रोत्सव सुरू होत आहे. दुर्गाडी किल्ला परिसरातील रस्त्यांवर नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. स्वागत कमानी, शुभेच्छा कमानी उभारणीची कामे सुरू आहेत. या कामासाठीचे सामान रस्त्याच्या बाजुला आणून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांची रूंदी सामानांमुळे कमी झाली आहे. एकावेळी एकाच मार्गिकेतून जाणारी वाहने आता दुर्गाडी किल्ला पायथा भागात एक मार्गिकेतून धावत आहेत. मागील अनेक वर्षाच्या काळात दुर्गाडी किल्ला भागात नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू झाली की या भागात वाहतूक कोंडी होते.