पत्रकार संजय राजाराम पंडित यांना “राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती महाराष्ट्र रत्न पुरस्कार” जाहीर
पुणे – समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी आयोजित “राष्ट्रभक्ती सन्मान सोहळा, पुणे” या राज्यस्तरीय कार्यक्रमात पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल मा. श्री. संजयजी राजाराम पंडित यांना “राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती महाराष्ट्र रत्न पुरस्कार” जाहीर झाला आहे.
पत्रकार संजय पंडित हे दररोजच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह समाजकार्यातही सक्रिय राहिले आहेत. कुटुंबाचे पालनपोषण, मुलाबाळांचे शिक्षण यांची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांनी समाजसेवा, जनजागृती आणि निर्भीड पत्रकारिता या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण केली आहे. ते कुशल समाजसंघटक, प्रामाणिक आणि रोखठोक भूमिका घेणारे पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र शासनालाही घ्यावी लागली असून, यापूर्वी त्यांना पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल “निर्भय पत्रकार”, “कुशल समाजसंघटक”, “समाज भूषण” तसेच “समाज प्रबोधनकार” या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
संजय पंडित यांच्या “राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती महाराष्ट्र रत्न पुरस्कार” निवडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाभिक समाजाचा अभिमान वाढला आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील युवकांना प्रेरणा मिळत असून, विविध समाजघटक आणि संघटनांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
हा पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पुण्यातील निवारा हॉल, वृद्धाश्रम, एस.एम. जोशी फाउंडेशन समोर, पत्रकार भवन शेजारी, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे









