आगरी समाज संस्था अलिबागच्या “विवाहमिलन” कार्यालयाचा उत्साहात शुभारंभ
भागवत जाधव अलिबाग मो.८८०५०२२५६५
अलिबाग, (Alibag)२० ऑक्टोबर २०२५: सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या बहुपयोगी उपक्रमाचा नवा टप्पा गाठण्यात आला आहे. संस्थेच्या “विवाहमिलन वधू-वर परिचय केंद्र” या प्रकल्पाच्या कार्यालयाचा शुभारंभ सोमवारी मोरया कॉम्प्युटर्स, ब्राह्मण आळी, महावीर चौकजवळ, अलिबाग(Alibag)येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यालयाचे उद्घाटन सुप्रसिद्ध आगरी खानावळचे मालक श्री. मंदार राऊत यांच्या हस्ते फित कापून, तर संस्थेचे वरिष्ठ सल्लागार श्री. अनंत म्हात्रे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी अनेक मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या या आधुनिक तंत्रज्ञानाधारित विवाह परिचय उपक्रमाद्वारे www.vivahamilan.com या संकेतस्थळावरून सर्व जातीय युवक-युवतींसाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अनेक पालकांना ऑनलाइन(online)नोंदणी करताना भासणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, संस्थेचे सभासद आणि मोरया कॉम्प्युटर्सचे मालक श्री. मिलिंद पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात “नोंदणी मदत केंद्र” सुरू करण्याचा पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमासाठी संस्थेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
विवाहमिलन केंद्राचे व्यवस्थापन व जबाबदारी श्री. मनोहर पाटील यांनी स्वीकारली असून, दिवाळीनंतर नियमित वेळापत्रक सकाळी ११ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते ६ असेल.
संपर्क: श्री. मनोहर पाटील — ९४२२५९४५७१ / ८१७७८३५११८ (विवाहमिलन हेल्पलाईन)
या शुभारंभ सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील, उपाध्यक्ष श्री. सुनील तांबडकर, सेक्रेटरी श्री. प्रभाकर ठाकूर, सहखजिनदार श्री. राजेंद्र पाटील, मुख्य सल्लागार श्री. अनंत म्हात्रे, श्री. प्रसाद पाटील, तसेच अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. तुषार थळे, श्री. श्रेयस ठाकूर, श्री. सार्थक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील म्हणाले, “विवाहमिलन कार्यालय हे समाजातील विविध उपक्रमांचे प्रमुख केंद्र ठरेल. तसेच संस्थेच्या ‘भव्य आगरी समाज भवन’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
संस्थेच्या या उपक्रमात सर्व सभासद आणि समाजबांधवांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शेवटी करण्यात आले.









