Home महाराष्ट्र तब्बल 8 वर्षांनी भरले माजी विद्यार्थ्यांचे कॉलेज जुन्या आठवणींना नव्या युगाचा उजाळा*

तब्बल 8 वर्षांनी भरले माजी विद्यार्थ्यांचे कॉलेज जुन्या आठवणींना नव्या युगाचा उजाळा*

154

तब्बल 8 वर्षांनी भरले माजी विद्यार्थ्यांचे कॉलेज जुन्या आठवणींना नव्या युगाचा उजाळा

दत्ता गोरे/शिरूर अनंतपाळ दि.३० आज रोजी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील श्री मन्मथ स्वामी उच्च माध्यमिक विद्यालय शिरूर अनंतपाळ येथील सन 2017 18 मध्ये उत्तीर्ण झालेल्या माझी विद्यार्थ्यांचे दि.24/10/2025 रोजी शिरून अनंतपाळ येथील पद्मा हॉटेल येथे स्नेह मेळावा उत्साहात पार पडला महाविद्यालयाच्या माझी विद्यार्थ्यांनी स्नेह आपुलकीचा गंध मैत्रीचा या टॅगलाईन खाली एकत्र येऊन आपल्या जुन्या आठवणीना उजाळा देण्याचे काम केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे कवीवर्य प्रा देवदत्त मुंढे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रा राजकुमार चाकोते व प्रा कुमार बंडे इतर शिक्षकवृंद तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजनाने झाली माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील आठवणीना उजाळा देत त्यांच्या अनुभवाची मनमोकळी केली त्याच बरोबर सांस्कृतिक कार्यक्रम मनोगत कवितांचे वाचन तसेच दोन वर्षातील आठवणी मनोगत व्यक्त करून आनंदित केल्या शिक्षकांनीही आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अभिमान व्यक्त केला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा देवदत्त मुंढे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात निराश न होता यशासोबत अपयशाच्याही कथा वाचणे गरजेचे आहे तसेच प्रत्येकांनी आपल्या जीवनात सकारात्मक विचार केला पाहिजे.एक दिवस नक्की यश तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले याबरोबरच आपल्या कवितेने वातावरण आनंदित करून टाकले याच बरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा कुमार बंडे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात उज्वल भरारी घेऊन आपल्या स्वप्नाला गवसणी घातली पाहिजे असे मत व्यक्त केले तसेच प्रा चाकोते सर यांनी विद्यार्थ्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजी विद्यार्थी पवन कांबळे यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केले तर कार्यक्रमाची प्रास्ताविक माजी विद्यार्थी निरंजन कांबळे यांनी केले तसेच शेवटी उपस्थिताचे आभार माजी विद्यार्थी स्वराज पाटील यांनी मांडले
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तुलसीदास वाघमोडे महेश वंगे तनुजा शेटे यांनी परिश्रम घेतले यावेळी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.