सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांची पालघर इथे बदली
म्हसळा: संतोष उद्धरकर.
म्हसळा:म्हसळा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीकारी म्हणुन ज्यांची ओळख निर्माण झाली होती ते सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काहाळे यांची बदली पालघर जिल्ह्यात करण्यात आली असून, त्यांच्या जागी ए.पी.आय. (API) रवींद्र अच्युत पारखे यांची म्हसळा पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत.
संदीप काहाळे यांनी म्हसळा येथील कार्यकाळात स्थानिक गुन्हेगारी नियंत्रण, आमली पदार्था वरील निर्बंध, गोवंश हत्या- तस्करी,वाहतूक शिस्त, तसेच सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला होता. हिंदू मुस्लिम समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते सहभागी होत असत. त्यांच्या पालघर बदलीनंतर स्थानिक नागरिक, पत्रकार, विविध संघटनेचे कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि सहकारी वर्गाकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. संदीप कहाळे यांचा फक्त १४ महिन्याचा कार्यकाळ लाभला, या काळात त्यांनी अतिशय शिस्तप्रिय,व अतुलनिय कामगिरी केली त्यामुळे संपूर्ण म्हसळाकरांच्या मनामध्ये कहाळे यांनी आपली जागा निर्माण करून कहाळे यांच्या बदलीने सर्वांना गहिवरून आल्याचे काहीसे चित्र पहायला मिळाले.
—————————————
समाजाला सोबत घेऊन चालत असतांना कोणतीही अडचण होत नाही. माझी अनेक ठिकाणी बदली होत असतांना म्हसळ्या मध्ये वेगळी संस्कृती पहायला मिळाली. या ठिकाणी सर्व सण गुण्यागोविंदाने साजरे होत आहेत. तुमच्या सोबत मला काम करण्याची संधी मिळाली, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या हे माझे भाग्य आहे.या ठिकाणी काम करीत असतांना म्हसळेकरांचे येवढे प्रेम मिळाले त्या साठी मी सदैव ऋणी राहीन.
संदीप कहाळे
सहायक पोलीस निरीक्षक पालघर.









